केंद्र सरकारचा 15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय,: मात्र राज्यांची तयारी नाही;

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. ११ ऑक्टो . – मुंबई -: केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याता निर्णय (School Re open ) जाहीर केला आहे. त्यासाठी मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. मात्र अनेक राज्यांची शाळा सुरू करण्याची तयारी नाही अशी माहिती पुढे आली आहे. केंद्राने निर्णय घेतला असला तरी अंतिम निर्णय हा त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. कोरोनाचा वाढता प्रसार कायम असल्याने शाळा सुरू करण्याबाबत सगळ्यांनाच संभ्रम आहे.महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी याबाबत अजुनही स्पष्टपणे आपली भूमिका जाहीर केली नाही. सध्या Online वर्ग आणि अभ्यास सुरू आहे. तो तसाच कायम ठेवावा असं काही राज्यांचं मत आहे. शाळा, कॉलेजेस सुरू झाली तर मुलं एकत्र येणार त्यामुळे पुन्हा कोरोना प्रसाराची भीती आहे.

सॅनिटायजेशन आणि इतर गोष्टींचा खर्चही अनेक शाळांना परवडणारा नाही त्यामुळे सध्याच्या संकटकाळात जबाबदारी नको असं राज्यांना वाटतं आहे.
शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही. राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही. मुलं घरी राहून Online माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे.शाळा सुरू झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये, त्याचबरोबर मुलांचे मन:स्वास्थ्य योग्य राहील याचीही काळजी घेण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत.शाळांनीही स्वच्छता आणि कोविडचे सुरक्षा नियम कडकपणे पाळावे असेही शिक्षण मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं होतं.


महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अनलॉकची घोषणा करत अनेक उद्योग आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. पण, अजूनही मंदिर, लोकल रेल्वे सेवा, जीम हे बंद आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कधी अनलॉक होणार याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुर्तास नकार दिला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरे कारशेड, कोरोनाची परिस्थिती आणि मंदिर उघडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.’लॉकडाउनमध्ये बंद पडलेले अनेक उद्योग आपण एक एक करून सुरू करत आहोत. हळूहळू सर्व उद्योग धंदे सुरू करण्यात येणार आहे. पण कोविडबद्दल आपल्या सर्वांना आता काळजी घ्यायची आहे. त्यामुळे जबाबदारी आपली आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *