ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार; सरकारचा नवा प्लान

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. ११ ऑक्टो . – नवीदिल्ली -: आता परदेशात असतानाही ड्रायव्हिंग लाइसन्संचं (Driving Licens) रिन्यूवल करता येणार आहे. कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.परदेशात अडकलेल्या ज्या भारतीयांच्या इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स परमिटची (IPD) वैधता संपली आहे. त्यांना आता Driving License रिन्यूवल करता येणार आहे. यांच्यासाठी केंद्राकडून मोटर व्हीकल नियम, 1989 मध्ये (Motor Vehicle Rules 1989) सुधारणा करण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) दुरुस्तीशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे.

ड्राफ्ट नोटिफिकेशननुसार, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स परमिटची वैधता संपली आहे, असे भारतीय नागरिक, भारतीय दुतावासाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. हे अर्ज वाहन (VAHAN)प्लॅटफॉर्मवर टाकले जातील. त्यानंतर अर्ज संबंधित आरटीओपर्यंत पोहचेल
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स परमिटसाठी सध्याच्या नियमांनुसार, मेडिकल सर्टिफिकेट आणि वैध व्हीजाचा तपशील द्यावा लागतो. पण नव्या दुरुस्तीत अशी व्यवस्था केली गेली आहे की, ज्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे, त्यांना आता मेडिकल सर्टिफिकेट देण्याची गरज नाही.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, 6 नोव्हेंबरपर्यंत सर्व संबंधितांकडून याबाबत सूचना मागितल्या आहेत. या सूचना ते मंत्रालयाच्या सह सचिवांकडे मेल किंवा पत्त्यावर पाठवू शकतात. तसंच देशातील ड्रायव्हिंग लाइसन्स आणि मोटार वाहन कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *