मनसे-शिवसेना नेत्यांची मध्यरात्री गुप्त बैठक, राजकीय चर्चांना उधाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १२ऑक्टो . – मुंबई – (प्रतिनिधी) : मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात गुप्त बैठक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर मनसे आणि शिवसेनेत काय गुफ्तगू झाली असावी अशा चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर, राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. कोरोना काळात अनेक मागण्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. यावेळी वारंवार शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर मनसेकडून निशाणा साधण्यात आला. पण आता रात्री झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात रब्बरवाला हाऊस इथं ही बैठक पार पडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या बैठकीत नेमकं काय झालं याचे आता तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे अनेक मुद्द्यांवर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मग तो लोकल सुरू करण्याचा मुद्दा असो, वाढीव वीजबिलावरोधात असो किंवा भूमीपुत्रांची भरती असो. या सगळ्यावर मनसेनं तीव्र भूमिका घेत तत्काळ बदल करण्याची मागणी सरकारकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *