महाराष्ट्रात उद्या, परवा मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १३ ऑक्टो . – मुंबई – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचे रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. येत्या बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात आणि गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याकडून दिला आहे.

सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात पुन्हा एकदा वादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करण्यासाठी जाऊ नये. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असे हवामान विभाकडून सांगण्यात आले आहे.

याचबरोबर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *