सीईटी परीक्षा, येत्या 12 ते 20 ऑक्टोबरदरम्यान पुन्हा परीक्षा घेणार

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १३ ऑक्टो . – मुंबई – मुंबई व परिसरात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी सीईटीच्या पहिल्या सत्रातील परीक्षेला पोहोचू शकले नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सीईटी सेलकडून परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाच्या परीक्षा 12 ते 20 ऑक्टोबरदरम्यान सीईटी सेलकडून घेण्यात येत आहेत. या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येत आहेत. पहिल्या सत्रातील परीक्षा 10 वाजता तर दुसर्‍या सत्रातील परीक्षा 2.30 वाजता होत आहे. परंतु सोमवारी वीजपुरवठ्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पुरवठा अचानक खंडित झाला. यामुळे मुंबईचे जनजीवन काही अंशी ठप्प झाले. तसेच लोकलसेवाही ठप्प झाली. लोकलने सीईटीच्या पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना त्यामुळे वेळेवर परीक्षा केद्रावर पोहोचणे शक्य झाले नाही.
मुंबईतील पाच केंद्रांवरील विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रामध्ये परीक्षा देता आली नाही. ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करियर डेव्हलपमेंट, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉन बॉस्को सेंटर असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.

परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या काही विद्यार्थ्यांना दुसर्‍या सत्रात परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली. मात्र काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही, तर काही विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी 20 ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी सेलकडून परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *