अवघ्या ५ रुपयात पुणेकरांना प्रवास करता येणार

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि . २२ ऑक्टो – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने आता पुणेकरांना पाच रुपयांत पुण्यातील ३७ मार्गावर प्रवास करता येणार आहे. पीएमपीएमएलच्या वतीने ही योजना अटल प्रवास योजना म्हणून पुणेकरांसाठी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमामुळे पुणेकरांना आता दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *