पुणे : कोरोना Recovery Rate मध्ये देशात पहिला नंबर

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २५ऑक्टो – पुणे : कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या पुण्यात आता कोरोना रुग्णांची संख्या घसरणीला लागली आहे. रुग्ण बरे होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा देशात पहिला क्रमांक असल्याची आकडेवारी पुढे आलीय. पुण्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.81 टक्के एवढा आहे. चेन्नई, दिल्लीला मागे टाकत पुणे देशात नंबर वन झाले आहे.


कोरोनाच्या बाबतीत पुणे बनलं होतं नंबर वन तेच पुणे आता रिकव्हरीत बनलं नंबर वन. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
चेन्नईचा रिकव्हरी रेट 92.68, दिल्ली – 90.76, तर मुंबईचा 88.81 टक्के एवढा आहे.
शनिवारी दिवसभरात पुण्यात 329 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 774 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
पुण्यात 23 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला त्यातले 4 रूग्ण पुण्याबाहेरचे आहेत.
सध्या 685 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 366 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 59 हजार 406 झालीय. तर 6 हजार 885 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत 4 हजार 105 जणांचा मृत्यू झालाय. तर 1 लाख 48 हजार 416 जणांनी कोरोनावर मात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *