IPL 2020: ऋतुराजचं सीमोल्लंघन ;चेन्नईचा बेंगळुरूला धक्का

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २६ ऑक्टो – शारजा -महाराष्ट्रातर्फे खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने दसरादिनी आयपीएल स्पर्धेत चेन्नईकडून अर्धशतकी खेळी करत जोरदार सीमोल्लंघन केलं.चेन्नईसाठी यंदा प्लेऑफच्या आशा मावळल्या असल्या तरी ऋतुराजच्या खेळीने चेन्नईच्या चाहत्यांना विजयाची भेट दिली. चेन्नईने बेंगळुरूला 8 विकेट्सनी नमवलं.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 22 सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले.तरुणांनी चमक दाखवली नाही असं महेंद्रसिंग धोनी काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत तो चेन्नईच्या भविष्यातील योजनांचा भाग असू शकतो याचे संकेत दिले.

0, 5, 0 अशी खराब सुरुवात झालेल्या ऋतुराजवर टीकाही झाली होती. मात्र या मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.
युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो प्रदीर्घ काळ खेळू शकला नाही.

यशस्वीचा धोनीला नमस्कार, पूरनची हवाई भरारी आणि केन भडकतो तेव्हाऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे.पण ऋतुराज पिंपरी चिंचवड ला राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे.
मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. 2018-19 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *