महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ नोव्हेंबर : सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत गॅस सिलेंडरसह इतर नियमांमध्ये बदल होत आहे. या मुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल होत आहे. सिलेंडरच्या घरपोच सेवेसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. तसेच राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहेसिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागणार आहे. ओटीपी नसल्यास ग्राहकांना सिलेंडर नाकारलं जाणार आहे.तसेच आजपासून राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. आता बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत सुरू राहतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकाना हा नियम लागू असेल. याबाबत काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयानं सूचना दिल्या होत्या. तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियानं बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. ०.25 टक्क्यांच्या कपातीनंतर आता व्याजदर 3.25 टक्के असणार आहे.