महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी- 3 नोव्हेंबर -पिंपरी – सध्या जगभर कोविड १९ आजाराच्या कोरोन व्हायरसने थैमान घातल्यामुळे प्रशासनाने आरोग्य व्यवस्था सतर्क केलेली आहे. राज्यभर ठीकठिकाणी कोव्हीड १९ ची रुग्णालये सुरु करण्यात आलेली आहेत. परिणामी पिंपरी येथील वायसीएम अर्थात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय कोव्हिड -१९ साठी राखीव करण्यात आले होते.. त्यामुळे इतर आजारांवरील उपचारासाठी शहरातील नागरिकांची कमालीची गैरसोय निर्माण झालेली असताना सर्वसामान्य रुग्णांना इतर आजारांवरील उपचारांसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय खुले करावे, नुकतेच या मागणीचे निवेदन पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते.
याची तात्काळ दखल घेत आयुक्तांनी मंगळवार,, दिनांक 3 नोव्हेंबरपासून शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे पाहून वायसीएम रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी 50 टक्के भागात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मागणीला यश आल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागिरकांमध्ये समाधान व्यक्त होत असून अण्णांंचे आभार मानले जात आहेत.
सदर निवेदनामध्ये आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे कि, कोव्हीड-१९ मुळे शहरात झालेल्या मृत्यू व इतर आजारांच्या रुग्णांचे उपचार न मिळाल्यामुळे झालेले मृत्यू याची तुलना केल्याने कदाचित इतर विकारांमुळे मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरातील नागरिकांना इतर विकारावरील उपचारासाठी खाजगी रुग्णालयाकडे जावे लागत असल्याने कमालीच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
परिणामी खर्चासाठी पैशानअभावी नागरिकांची कुचुंबना होत आहे. गरीब व गरजू रुग्णांना मोफत सवलतीच्या दारात उपचार देण्याची मनपाची जबाबदारी असताना शहरातील नागरिकांची गैरसोय होणे योग्य नसल्याने तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय तातडीने पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी आवश्यक योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्तांना दिलेल्या होत्या.
पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय ( वायसीएम) कोविड समर्पित रुग्णालय म्हणून घोषित केले होते. इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात नव्हते. त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांचे हाल होत होते. सप्टेंबरपासून कोरोनाची रुग्णसंख्या उतरणीस लागली. त्यामुळे वायसीएम रुग्णालय खुली करण्याची मागणी होत होती. याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व तात्काळ इतर रुग्णांसाठी वायसीएमएच 50 टक्के सुरू केले आहे. वायसीएममध्ये दोन जिने आहेत. मधले वेगवेगळे आहेत. एका बाजूने कोविड तर एका बाजूने नॉन कोविड रुग्णांसाठी एंट्री ठेवली जाणार आहे.