राज्य सरकार देणार एक हजार कोटी ; एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन महिन्यांचे वेतन,

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ११ नोव्हेंबर – मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन महिन्यांचे थकीत असलेले संपूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच राज्य सरकारने एसटीला एक हजार कोटीची मदत केल्याने पुढील सहा महिन्यांची वेतनाची चिंता मिटली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परिवहनमंत्री अॅड. अनिल परब पुढे म्हणाले की, एसटी कर्मचाऱयांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि यावर मार्ग काढण्यात आला आहे. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यांसाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱया सुमारे 3 हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाडय़ांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. त्यामुळे आणि कर्मचाऱयांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱयांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. राज्य सरकारकडूनही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे असल्याचेही परब यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *