‘जमिनी विकून 4 दिवस बीएमडब्ल्यूमध्ये फिराल, पुढे काय?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ११ नोव्हेंबर – पुणे – मावळमधल्या एका गृहप्रकल्पाचं उद्घाटन करताना महसूलमंत्री तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं, “मावळ आणि मुळशीमधील जमिनीला सोन्याचा भाव आहे. त्यामुळे या दोन भागांना महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हॉट प्लेट म्हणून ओळखल जातं. चांगला विकास होत आहे. अनेक जण राहण्यासाठी येत आहेत. जमिनी विकून चार दिवस महागड्या मोटारीत फिराल. पण पुढे काय? त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे पैसे दुप्पट झाले पाहिजेत या दृष्टीने काम करा. अन्यथा शिर्डीमध्ये मूळची माणसं शोधून सापडत नाहीत, तशीच अवस्था मावळ ची होऊ नये.” .

“सर्वांनी एक काळजी घेतली पाहिजे. नव्या पिढीकडे चार पैसे येतील त्याची गुंतवणूक जास्त कशी वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपली परिस्थिती आणखी चांगली कशी होईल हे पाहिलं पाहिजे,” असंही ते पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *