विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. १२ नोव्हेंबर – विवोने भारतात विवो व्ही 20 एसई हा नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या फोनची किंमत 20 हजार 990 रुपये इतकी असणार असल्याचे समजते. या नव्या स्मार्टफोनची विक्री 3 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून इ स्टोअरशिवाय महत्त्वाच्या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या फोनला स्नॅपड्रगन 665 चिपसेट असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजची सोय आहे. 6.44 इंचाचा इमोलेड डिस्प्ले, वॉटरड्रॉप नॉच तसेच 32 एमपीचा कॅमेरा ही वैशिष्टय़े या फोनमध्ये आहेत. सुपर नाइट सेल्फी, ऑरा स्क्रीन लाइट आणि इतर वैशिष्टय़ेही यात समाविष्ट असतील. 4 हजार 100 एमएएचची बॅटरी याला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *