महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १५ नोव्हेंबर – जगभरात सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वाढत चालला आहे. आताही कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी स्तरावर वाढ होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर कोरोना विषाणूंची लागण 5.43 कोटी जनतेला झाली आहे. जगभरात गेल्या 24 तासांत 5 लाख 43 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 807 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश अमेरिकेत ही परिस्थिती अत्यंत वाईट होत चाचली आहे. अमेरिकेत दररोज दीड ते दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.
जगभरात जवळपास 13 लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू
वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, आतापर्यंत जगात 5 कोटी, 43 लाख 12 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली गेली आहे. तर आतापर्यंत 13 लाख 17 हजार 398 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या महामारीतून 3 कोटी 78 लाख लोक बरे झाले आहेत. सध्या 1 कोटी 51 लाख रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील एक लाख लोकांची प्रकृती गंभीर आहे.