सर्वांना कोरोना लस मोफत द्या ! नारायण मूर्ती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ नोव्हेंबर – देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस ही मोफत दिली गेली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका ‘इन्पहसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी बुधवारी मांडली. लस बनवणाऱ्या कंपन्यांना संयुक्त राष्ट्रांकडून किंवा संबंधित देशांकडून निधी दिला गेला पाहिजे असे मूर्ती यांनी म्हटले आहे.

नारायण मूर्ती यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका मांडली. रोग प्रतिबंधक लसी या प्रत्येकाला मोफत मिळाल्या पाहिजेत असे आपले मत असल्याचे सांगतानाच त़्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱया कंपन्यांनी त्यांना शक्य असेल तर त्या लसीचा विनामूल्य पुरवठा केला पाहिजे असेही मत व्यक्त केले. हिंदुस्थानातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी सरकारला सुमारे तीन अब्ज डोस तयार करावे लागणार आहेत.

कायमस्वरूपी ‘वर्प फ्रॉम होम’ अयोग्य
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरूनच काम करण्याचा पर्याय देशात स्वीकारला गेला, परंतु ‘वर्प फ्रॉम होम’चा हा पर्याय कायमस्वरूपी राबवण्यास नारायण मूर्ती यांनी असहमती दर्शवली. ‘हिंदुस्थानात बहुतांश लोकांची घरे छोटी आहेत. छोटय़ा घरांमध्ये कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड होते.’ असे मूर्ती म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *