निवार वादळ धडकले; तामिळनाडू, पुड्डुचेरीतून एक लाख लोकांना हलवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ नोव्हेंबर – तामिळनाडू आणि पुड्डुचेरी किनारपट्टीवर निवार हे वादळ रात्री साडेअकराच्या सुमारास धडकले. मुसळधार पावसामुळे चेन्नईचा पूनमल्ली परिसर जलमय झाला. IMD ने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 2.30 वाजता लँडफॉल झाल्यानंतर वादळाची गती कमी होत चालली आहे. पुड्डुचेरीचे पुढे हवेचा वेग कमी होऊन 65 ते 75 किलोमीटर प्रतितास राहील. परंतु धोका अजूनही टळलेला नाही.

या वादळामुळे कड्डलोर, पुड्डुचेरीसहित अनेक जिल्ह्यात मागील 17 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना सावधगिरीचा उपाय म्हणून घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तामिळनाडूतून १ लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर, पुड्डुचेरीतून १ हजार लोकांना हलवण्यात आले. तामिळनाडूत १३ जिल्ह्यांमध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांच्यानुसार, निवार वादळामुळे सर्वाधिक नुकसान पुड्डुचेरी आणि कराइकलमध्ये होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुड्डुचेरीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दूध, पेट्रोल पंप आणि औषधी दुकाने वगळता इतर बाजारपेठा बंद राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *