महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ डिसेंबर -ऑस्ट्रेलियाची टीम रविवारी जेव्हा भारताविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्याच्या पुढे करा किंवा मरा स्थिती असेल. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया १-० ने पुढे आहे. टीमने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले होते. लेग स्पिनर यजुवेंद्र चहल विजयाचा हीरो ठरला. त्याने २५ धावा देत तीन बळी घेतले होते. त्याचबरोबर टी-२० मध्ये पदार्पण करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजने देखील महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने तीन विकेट घेतल्या. त्यामुळे टीम १६१ धावांचे लक्ष्य वाचवू शकली. भारताकडून सलामीवीर व उपकर्णधार लोकेश राहुलने अर्धशतक झळकावले. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. हेनरिक्स व जम्पाने शानदार गोलंदाजी केली. जडेजाने २३ चेंडूंत नाबाद ४४ धावा काढत संघाला सन्मानजनक धाव संख्या उभारून दिली होती.
ऑस्ट्रेलियाने वनडेत उतरवलेल्या अंतिम-११ संघात बदल केला होता. मार्नस लबुशेनला संघात स्थान मिळाले नाही. अॅलेक्स करी व एस्टन एगरदेखील बाहेर होते. मात्र, फलंदाजी मधल्या फळीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. मालिकेत कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. कर्णधार अॅरोन फिंच जखमी आहे. अशात त्याचा पुढील सामना खेळणे संदिग्ध आहे. लायनचा उर्वरित दोन सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला नाही. अशात त्याला पुन्हा संघात स्थान दिल्या जाऊ शकते.