मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ; आज घटनापीठासमोर सुनावणी होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ९ डिसेंबर – मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दिलेल्या स्थगितीबाबत बुधवारी (दि. 9) पाचसदस्यीय घटनापीठासमोर hearing in supreme court today before the five member bench) सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजता ही सुनावणी घेण्यात येईल. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठ या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे.

मराठा आरक्षणाच्या ( maratha reservation) स्थगितीसंबंधी घटनापीठ काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश दिल्यानंतर त्यावर पुढील सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारने (maharashtra government on maratha reservation) चार वेळा पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. राज्य सरकारने 20 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारे चार अर्ज करण्यात आले होते.

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाचे वरिष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकताही व्यक्‍त केली होती. अशाच प्रकारे स्थगिती उठवण्याचा अर्ज मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने केलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या हजारो विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले होते. त्यानुसार आता ही सुनावणी होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *