महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ डिसेंबर – केटीएम कंपनीची नवी सुधारीत आवृत्तीची डय़ुक बाईक नुकतीच बाजारात दाखल करण्यात आली आहे. या बाईकची सुरूवातीची किंमत दीड लाख रुपये असणार आहे. 125 सीसीच्या केटीएम 125 डय़ुक या गाडीत अनेक नव्याने सुविधा समाविष्ट केल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि सिरॅमिक व्हाइट या रंगात ही बाईक उपलब्ध होणार असून तिला 13.5 लिटर क्षमतेची टाकी असणार आहे. उत्तम सस्पेन्शनसह या गाडीचा लुक आकर्षक करण्यात आला आहे. सुरूवातीची गाडीची किंमत दीड लाख रुपये असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.