महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ डिसेंबर -देशाचे लोकनेते नामदार शरदचंद्र पवार साहेब म्हणजे देशाचा आधारवड……कारणं देशावर आलेल्या व घडवलेल्या अनेक संकटाना पवार साहेबांनी विचार पूर्वक सोडविले आहेत………मग ते मुंबईत दहशतवादींनी घडवलेले एकाचवेळी बारा बाॅमब स्फोट असतील., किल्लारी चा भूकंप असेल, शेतीचा दुष्काळ असेल, कामगारांच्या समस्या असतील, नवीन उदयोगांचे प्रश्न असतील, स्थिरावलेल्या कंपन्यावर होणारी अनेक प्रकारची स्थानीक गुंडगीरी असेल ,
साखर कारखाने सहीत सहकार क्षेत्राच्या अडचणी असतील, शिक्षण क्षेत्र खेडयात पोहोचवण्याची अडचणी असतील, अल्पभूधारक शेतकरींचे व शेतमजुरांचे प्रश्न असतील , मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय यांचा सामाजिक विकासाच्या समस्या असतील व महिलांच्या समान हक्का बाबतीत प्रश्न असतील अशा अनेक अडचणीचे मार्ग सोडवतांना इतर कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेवून धैर्यानं निर्णय घेणारे विराट रूप म्हणजे वडाच्याझाडा सारखच म्हणाव लागेल येईल त्या वाटसरूला धिर देवून सावली देणारे पवार साहेब म्हणजे देशाचे आधारवडच आहेत. साहेबांना ८० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …