महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ डिसेंबर – : जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने मनमाडच्या अस्तगाव येथील जवान सुरेश घुगे यांना वीरमरण आले आहे. रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली असून त्यांच्या निधनाने वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली.

सुरेश घुगे 2006 साली सैन्य दलात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियन मध्ये कार्यरत होते. गुरुवारी रात्री डोंगरावर गस्त घालत असतांना पाय घसरून घुगे खाली पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 9 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. जवान घुगे यांच्या निधनानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावानं भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *