आता दिव्यांगांसाठी राज्य शासनाचे ‘महा शरद’ पोर्टल, समाजामधील दानशूर व्यक्ती करू शकतील मदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ डिसेंबर – दिव्यांगांचे जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी यासाठी विविध सहाय्यक उपकरणांची आवश्‍यकता असते. त्याचवेळी समाजामध्ये दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्‍यक सहाय्यक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. मात्र, या दोघांमध्ये दुवा साधला जात नसल्याने दिव्यांगांना आवश्‍यक असणाऱ्या सहाय्यक साधनांची कमतरता जाणवते. हा दुवा साधण्यासाठी राज्य शासनाने ‘महा शरद’ नावाचे वेब बेस्ड पोर्टल कार्यान्वित केले आहे.

दिव्यांगाना सुविधांसाठी शरद (सिस्टीम फॉर हेल्थ ऍण्ड रिहॅबिलिटेशन असिस्टन्स फॉर दिव्यांग) हे अभियान 12 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यान्वित पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींनी तसेच दिव्यांग व्यक्तींना साहाय्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटनांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यातील दिव्यांगांना त्यांचे जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी यासाठी विविध सहाय्यक उपकरणांची आवश्‍यकता असते. जेणेकरून ते त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करू शकतील व जनसामान्याप्रमाणे जीवन जगू शकतील. त्यांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी कोणत्या सहाय्यक उपकरणांची आवश्‍यकता आहे हे जाणून घेण्यासाठी, आवश्‍यक ती वैद्यकीय चाचणी करून घेणे व त्याआधारे सहाय्यक उपकरणे निश्‍चित करणे आवश्यक आहे, असे केल्यानंतरही मर्यादित साधनसंपत्तीअभावी त्याची पूर्तता करणे शक्‍य होत नाही. त्याचवेळी समाजामध्ये दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्‍यक सहाय्यक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. मात्र, या दोघांमध्ये दुवा साधला जात नसल्याने दिव्यांगांना आवश्‍यक असणाऱ्या सहाय्यक साधनांची कमतरता जाणवते. हा दुवा साधण्यासाठी एक विश्वासाधारित व्यासपीठ निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने ‘महाशरद’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *