बलात्काऱ्याला नपुंसक बनवणार ; पाकिस्तानात कठोर कायद्याला मंजुरी;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ डिसेंबर – पाकिस्तानमध्ये बलात्काराविरोधात कठोर कायदा करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करणं तसचं कठोर शिक्षा देण्याची या कायद्यात तरतूद आहे. इतकंच नाही तर तर दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक करण्याचाही उल्लेख या कायद्यात आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

नव्या कायद्यामध्ये बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचं नॅशनल रजिस्टर तयार केलं जाणार आहे. यासोबतच पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं असून या नव्या अध्यादेशांतर्गत बलात्कार प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालयं उभारली जाणार आहेत. चार महिन्याच्या आत प्रकरणाचा निकाल लावला जाईल.

नव्या अध्यादेशानुसार, पीडितेची ओळख जाहीर करण्यास मनाई आहे आणि तसं केल्यास शिक्षा होऊ शकते. जर पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे तपास झाला नाही तर त्यांना जंड तसं तीन वर्षांपर्यंत जेल होऊ शकते. याशिवाय पोलीस किंवा सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांनाही शिक्षा दिली जाईल. निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, वारंवार गुन्हा करणाऱ्यांना नपुंसक बनवण्यात येईल.

पंतप्रधानांकडून निधी सुरु करण्यात येणार असून तो पैसा विशेष न्यायालयं उभारण्यासाठी वापरला जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारंही आर्थित मदत उभी करतील अशी माहिती निवेदनात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *