मेसेज ज्याला येईल त्यालाच देण्यात येणार कोरोना लस – राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ डिसेंबर – देशात आणि राज्यात सध्या कोरोनाला लसीकरणाची जोरदार पूर्व तयारी सुरु झाली असून कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मायक्रो प्लॅनिंग सुरु केले आहे. लस देण्यासाठी एक कार्यपद्धती ठरविण्यात आली असून त्यानुसार लस ज्या तारखेला द्यायची आहे, त्याबाबतच मेसेज संबंधित व्यक्तीला केला जाईल. ती व्यक्ती त्यानंतर आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

केंद्र सरकार लसीकरणाबाबत माहिती मागवत असून आरोग्य सेवक, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जात असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. यासाठी १८ हजार लोकांना प्रशिक्षण द्यायचे काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो आल्यावर त्याची ओळख पटल्यावरच त्याला लस देणार अशा प्रकारचे मायक्रो प्लानिंग सुरु असल्याचे, टोपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *