महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर – पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थे आहे. सलग १२ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. करोना लसीकरण सुरु झाले असून त्याला काही देशामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी कच्च्या तेलामध्ये सध्या तेजी दिसून येत आहे.
आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.