महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २७ डिसेंबर – पुणे : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनमुळे गेले ७ महिने शाळेतील सर्व विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मुले जरी रोज आपल्या आवडत्या शिक्षकांना ऑनलाईन भेटत असले तरी नेहमीच ते आपल्या शाळेला आणि शिक्षकांना मिस करत असतात. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील टॉप लीड ॲक्टिविटी लर्निग स्कूल असलेल्या रेनबो प्रि-प्रायमरी स्कूलने नाविन्यपूर्ण उपक्रम नुकताच राबविला. नुकत्याच पार पडलेल्या नाताळ या सणाचे औचित्य साधून मुलांच्या मनातील विचार ऐकण्यासाठी विश फॉर सांता हा उपक्रम राबवला गेला. विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर शिक्षणाचे विविध उपक्रम रेनबो प्रि-प्रायमरी स्कूलच्यावतीने नेहमीच राबवले जात असतात… अगदी अल्पावधी काळात ही शाळा आंबेगाव, वडगाव, कात्रज, सिंहगड रोड परिसरातील पालकांच्या आवडीची बनली आहे. नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थी आपल्या मनातील इच्छा सांताला सांगणार होते. याद्वारे सर्वच विद्यार्थ्यांनी एकच इच्छा व्यक्त केली. हा कोरोना लवकर जाऊ दे, शाळा लवकर सुरू होऊ दे आणि आम्हाला शाळेत आमच्या टीचर सोबत खेळायला मिळू दे.
मुलांची शाळेबद्दलची आत्मियता, आस्था व ओढ पाहून शालेय व्यवस्थापन, प्रिन्सिपल आणि सर्व शिक्षिकांनी एका अनोख्या उपक्रमाचे नियोजन केले. ख्रिसमस सप्राईज सिक्रेट सांता. हा उपक्रम राबविला. ज्याप्रमाणे सांता क्लॉज क्रिसमस पूर्व संध्येला मुलांच्या घरी जातो आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना गिफ्ट देतो. त्या प्रमाणेच रेनबो स्कूलचे प्रिन्सिपल आणि शिक्षक नाताळच्या पूर्वसंध्येला सांताक्लॉज बनून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना शाळेकडून छोटीशी शालेय भेट देण्यात आली. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वच पालक वर्गातून शाळेचे आणि त्यांच्या शिक्षिकांनचे सर्वतोपरी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोरोना संबधितेच्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत रेनबो प्रि-प्रायमरी स्कूल, आंबेगाव बु. पुणे ही शाळा, शाळेतील शिक्षकवृंद आपल्या लाडक्या छोट्या मित्रांना भेटायला त्यांच्या घरी गेले. केवळ त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना आनंदी करण्यासाठी ! या उपक्रमाला सर्व पालकांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला. लोकडाऊन मुळे शाळा बंद, मुले शाळेत येऊ शकत नाहीत ,टीचर ना भेटू शकत नाहीत पण टीचर मुलांना घरी जाऊन तरी भेटू शकतात ना त्यांच्याशी खेळू शकतात ! ही कल्पना शाळेने पालकांसोबत ऑनलाईन व्हर्च्युअल मिटिगद्वारे मांडली. आणि सर्व पालकांनी त्याला पूर्णपणे संमती दिली. आणि महत्वाचं म्हणजे पालकांनी या बद्दल मुलांना याबद्दल काहीच कल्पना दिली नव्हती. त्यामुळे मुलांना हे सर्व अनपेक्षित वाटले. व सरप्राईज देखील मिळाले.
