सलाम ; रक्त गाेठवणाऱ्या थंडीत भारतीय सैनिकांची गस्त, अरुणाचलमध्ये झीरो पॉइंटवर सज्ज

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २७ डिसेंबर – भारतीय सैन्याने एलएसीवर शत्रूला कडक संदेश दिला आहे. ‘100 साल तक एक भेड़ की तरह जीने से अच्छा है कि सिर्फ एक दिन शेर की तरह जियो।’ अशी अक्षरे काेरलेले शिल्प लक्ष वेधून घेते. यातून चीनच्या काेणत्याही चालबाजीला सहन करण्याची भारताची तयारी नाही. त्याला ठाेस उत्तर दिले जाईल, हेही स्पष्ट हाेेते. चीनला धडा शिकवण्यासाठी सैनिक सज्ज आहेत. पूर्व लडाखमध्ये एलएसीवर तणाव असताना अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात इंडाे-तिबेट सीमा पाेलिसांना सतर्कतेच्या सूचना आहेत. रक्त गाेठवणाऱ्या थंडीत जवान स्नाे सूट घालन सीमेवर झीराे लाइनपर्यंत गस्त घालत आहेत. त्यामुळे काेणतेही कारस्थान उधळून लावता येऊ शकते. आयटीबीपीच्या ५५ बटालियन कमांडर कमांडेंट आयबी झा म्हणाले, कडाक्याच्या थंडीत आमच्यासमाेरील आव्हाने आणखी वाढतात. परंतु आम्ही पूर्ण तयारीत आहाेत. आम्हाला काेणीही चकमा देऊ शकत नाही.

गेल्या काही दिवसांत सीमेवरील पायाभूत गाेष्टींवर खूप काम झाले. त्यामुळे आपले जवान गस्तीसाठी तवांगच्या सीमेपर्यंत जाऊ शकतात. यातून आपल्याला शत्रूवर प्रत्युत्तरादाखल कारवाई करता येऊ शकते. त्याशिवाय जवानांचा पाेशाख इत्यादी पायाभूत गाेष्टींवरही काम झाले. सध्या या भागात ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहू लागले आहेत. अलीकडेच येथे बर्फवृष्टीही सुरू झाली आहे. तापमान नीचांकी गेले आहे.

१५ हजार फूट उंचीवर सामान पाेहाेचवले
– एलएसीजवळील फाॅरवर्डवर तैनात जवान म्हणाले, रस्त्याच्या माध्यमातून पाेहाेचणे कठीण आहे, अशा ठिकाणी सैनिक सज्ज आहेत. त्यासाठी १५,५०० फूट उंचीवर आवश्यक साधने पाेहाेचवण्याचेही काम करावे लागते. याकच्या (बर्फाळ प्रदेशातील बैल) साहाय्याने ९० किलाे वजनाचे सामान नेता येऊ शकते.

– तवांग सेक्टर एलएससीवर ईशान्येतील सर्वात संवेदशनील भाग आहे. १९६२ च्या युद्धात चीनचे सैन्य भारतीय भागात घुसखाेरी करण्यात यशस्वी ठरले हाेते. आता संवेदनशीलता लक्षात घेऊन शत्रूच्या कारवायांपासून बचावासाठी भारतीय सैन्य माेठ्या प्रमाणात तैनात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *