ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला ; लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर – ऍडलेडमध्ये पहिल्या टेस्टमध्ये 36 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर भारतीय टीमवर (India vs Australia) मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. अनेकांनी भारतीय खेळाडूंच्या तंत्रावरच प्रश्न उपस्थित केले होते. पण दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमने धमाकेदार पुनरागमन केलं. मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा 200 रनवर ऑल आऊट केला. याचसोबत ऑस्ट्रेलियाच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन नेहमीच खासकरून घरच्या मैदानात विरोधी टीमच्या बॉलरवर दबाव बनवून ठेवतात. आपल्या आक्रमक खेळीसाठी ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन ओळखले जातात. पण भारतीय बॉलरसमोर कांगारूंनी अक्षरश: लोटांगण घातलं. मेलबर्न टेस्टमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाची इनिंग संपली तेव्हा त्यांच्या नावावर 32 वर्षातला नकोसा रेकॉर्ड झाला.

मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकही बॅट्समनला अर्धशतक करता आलं नाही. पहिल्या इनिंगमध्ये मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 48 रन केले, तर दुसऱ्या इनिंगमध्ये कॅमरून ग्रीन याने 45 रनची खेळी केली. याआधी मायदेशात 1988 साली ऑस्ट्रेलियान बॅट्समनना संपूर्ण टेस्टमध्ये एकही अर्धशतक करता आलं नव्हतं.

एवढच नाही तर गेल्या काही टेस्ट मॅचेसमध्येही एकाही ऑस्ट्रेलियन खेळाडूला शतक करता आलं नाही, दुसरीकडे भारतीय बॅट्समननी 6 शतकं केली आहेत. यामध्ये पुजाराच्या नावावर 3 शतकं आहेत, तर विराट कोहली, ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रत्येकी 1-1 शतक केलं आहे.

मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेलं 70 रनचं आव्हान हे तिसरं सगळ्यात छोटं आव्हान आहे. याआधी 2013 साली ऑस्ट्रेलियाने चेन्नई आणि दिल्लीमध्ये भारताला 50 आणि 56 रनचं आव्हान दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *