BCCI ने युवराज सिंगला , निवृत्ती मागे घ्यायची परवानगी नाकारली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर – भारताचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंग (Yuvraj Singh) याला बीसीसीआय (BCCI) ने धक्का दिला आहे. मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या युवराजला सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये खेळायचं होतं, पण बीसीसीआयने युवराजची निवृत्ती मागे घ्यायला परवानगी दिली नाही. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार युवराज सिंगला बीसीसीआयने संन्यास मागे घ्यायला मंजुरी दिली नाही. युवराजने पंजाबचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी बीसीसीआयला विनंती केली होती. आता मनदीप सिंगच्या नेतृत्वात पंजाबची टीम मैदानात उतरणार आहे.

10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या टी-20 स्पर्धेसाठी पंजाबने युवराजची टीममध्ये निवड केलेली नाही. बीसीसीआयने राज्याच्या टीममध्ये युवराजच्या निवडीला परवानगी दिली नाही. मागच्याच आठवड्यात युवराज मोहाली स्टेडियममध्ये सराव करताना दिसला होता.

पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनित बाली यांनी युवराजला निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळण्याचं आवाहन केलं होतं, यानंतर युवराजची पंजाबच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या यादीत निवड झाली होती. पण निवड समितीने युवराजला 20 सदस्यीय टीममध्ये संधी दिली नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार परदेशामध्ये लीग खेळणाऱ्या खेळाडूंना भारताकडून स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय मॅच खेळता येत नाहीत, त्यामुळे युवराजला निवृत्तीतून पुनरागमन करायला बीसीसीआयने परवानगी दिली नसल्याचं सांगितलं जात आहे. युवराज सिंग हा कॅनडामध्ये झालेल्या लीगमध्ये खेळला होता.

पंजाबची टीम

मनदीप सिंग (कर्णधार), गुरकीरत मान (उपकर्णधार), रोहन मारवाह, मयंक मारकंडे, बरिंदर सरन, अभिषेक शर्मा, रमनदीप सिंग, सिद्धार्थ कौल, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, बलतेज ढांढा, कृष्ण गितांश खेरा, अनमोलप्रीत सिंह, अममोल मल्होत्रा, सनवीर सिंग, संदीप शर्मा, करण कालिया, अभिनव शर्मा, प्रभसिमरन सिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *