भारतीय नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती सध्या स्थिर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी – भारतीय नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना हदयविकाराचा झटका आहे. त्यांना उपचारासाठी वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार गांगुली यांना छातीत दुखू लागल्याने कोलकातामधील वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (BCCI President Sourav Ganguly admitted to Woodland Hospital in Kolkata West Bengal)

छातीत अचानक दुखायला सुरुवात झाल्यानंतर सौरभ गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या माजी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

सौरभ गांगुली यांना अचानक त्यांच्या राहत्या घरी जिममध्ये व्यायाम करत असताना छातीत तीव्र वेदना झाली आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सुरुवातीच्या अहवालांनुसार त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. (BCCI President Sourav Ganguly admitted to Woodland Hospital in Kolkata West Bengal)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *