यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या आणि चांदीच्या किमती कमी ; जाणून घ्या आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – १२ जानेवारी – यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या आणि चांदीच्या किमती (Gold Silver Price)अस्थिर झाल्यात. ग्लोबल संकेतांनुसार तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोन्याच्या दरामध्ये घसरण झालीय. मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज(MCX) वर फेब्रुवारीच्या सोन्याच्या वायदा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 0.03 टक्क्यांनी कमी झालाय. सोन्यासारखे चांदीचे दरही घसरले आहेत. मार्चचा चांदीचा वायदा भाव 0.22 टक्के प्रति किलोग्रॅमनं पडलाय. शुक्रवारी मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात 0.7 टक्के तेजी आली होती. (Gold Silver Price Today 12 January 2021 Gold Prices Fall For Second Time In 3 Days)

MCX वर आज फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव 14 रुपयांनी घसरून 49,328 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. चांदीची किंमत 155 रुपयांनी घसरून 65,400 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु डॉलरच्या मजबुतीमुळे तेजी पाहायला मिळत नाहीये. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून 1847.96 डॉलर प्रति औंस, तर चांदी 0.8 टक्क्यांनी वाढून 25.11 डॉलर प्रति औंस झालीय.

सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने 389 रुपयांनी वाढून 48866 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. मागच्या सत्रात सोने 48477 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीची किंमतही या सत्रात 1137 रुपयांच्या तेजीसह 64726 रुपये प्रति किलोग्रामवर बंद झालीय, मागच्या व्यापार सत्रात 63589 रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bonds) ची दहावी मालिकेंतर्गत 11 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान यात गुंतवणूक करू शकता. यासाठी सेटलमेंटची शेवटची तारीख 19 जानेवारी आहे. दहाव्या मालिकेत रिझर्व्ह बँकेनं एक ग्रॅम सोन्याची किंमत 5104 रुपये ठेवली आहे. जर कोणत्याही गुंतवणूकदारानं यासाठी ऑनलाईन अप्लाय केल्यास डिजिटल मोडमध्ये पेमेंट केले जाते. त्यांना 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळते. यासाठी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5054 रुपये असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *