महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २०. जानेवारी – आयटी सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱया एचसीएल टेक्नॉलॉजीस कंपनीकडून आगामी काळात नव्या उमेदवारांच्या भरतीला प्राधान्य दिले जाणार आहे. पुढील दोन तिमाहीत ही नवी भरती होणार असून सुमारे 20 हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नोएडाच्या कंपनीने 10 अब्ज डॉलर्सचा टप्पा कॅलेंडर 2020 वर्षात पार केला आहे. येणाऱया काळात 12 हजार 400 आणि 6 हजार 500 हून अधिक कर्मचारी नव्याने कंपनीत सामावून घेतले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.