बिल्ट-इन की-बोर्ड असलेला जगातील पहिला ५-जी स्मार्टफोन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ जानेवारी – लंडन : फिजिकल की-बोर्ड असलेले स्मार्टफोन सध्या इतिहासजमा होत आहेत. सध्याचा जमाना फोल्डेबल, रोलेबल स्मार्टफोनचा ठरू लागला आहे. अशा वेळीच एक खास स्मार्टफोन आला आहे. हा बिल्ट-इन की-बोर्ड किंवा फुल्ल की-पॅड असलेला जगातील पहिलाच 5-जी स्मार्टफोन आहे. त्याचे रूपांतर एखाद्या मिनी लॅपटॉपमध्ये होऊ शकते!

या स्मार्टफोनचे नाव ‘अ‍ॅस्ट्रो स्लाईड 5-जी’ असे आहे. ‘प्लॅनेट कॉम्प्युटर्स’ने हा स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने म्हटले आहे की हा आतापर्यंत घोषणा झालेल्या स्मार्टफोन्सपैकी सर्वात वेगवान 5-जी फोन आहे. अ‍ॅस्ट्रो स्लाईड 5-जी फोनमध्ये रॉकअप स्लायडर हिंज देण्यात आले आहेत. ते पॉवरफुल्ल 6.39 इंच टचस्क्रीन स्मार्टफोनचे रूपांतर एका मिनी लॅपटॉपमध्ये करतात. ‘पॉकेटलिंट’च्या रिपोर्टनुसार फुल्ल की-पॅड असणार्‍या या 5-जी स्मार्टफोनमध्ये ‘मेडियाटेक डायमेन्सिटी 800 प्रोसेसर’ देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.39 इंचाचा फुल्ल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजही आहे. तसेच मायक्रोएसडी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने फोनच्या स्टोरेजला 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा असून सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *