इंग्लंडचा लंकन भूमीत 2-0 ने मालिका विजय

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २७ । कोलंबो । इंग्लंडने यजमान श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी 6 गडी राखून जिंकत 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचा लंकन भूमीतील हा सलग 6 वा कसोटी विजय असून 2018 मधील मालिकेत 3 तर त्यापूर्वी 2012 मधील मालिकेत शेवटची कसोटी त्यांनी जिंकली होती. या 6 पैकी 5 विजयात इंग्लंडचे नेतृत्व रुटकडे राहिले आहे.

या विजयासह रुटने लंकन भूमीत कसोटी जिंकण्याच्या निकषावर विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. रुटने 4 डावात 426 धावांचे योगदान दिले. तो सामनावीर व मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांचा मानकरी ठरला. इंग्लंडचा संघ आता लंकेतून थेट चेन्नईला रवाना होणार असून येथे भारताविरुद्ध ते 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद 381. इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 344. लंका दुसरा डाव ः सर्वबाद 126 (लसिथ एम्बुल्डेनिया 42 चेंडूत 40, डॉम बेस 4-49, जॅक लिच 4-59, जो रुट 0 धावेत 2 बळी). इंग्लंड दुसरा डाव ः 43.3 षटकात 4 बाद 164 (डॉम सिबली 144 चेंडूत नाबाद 56, जोस बटलर 48 चेंडूत नाबाद 46. लसिथ एम्बुल्डेनिया 3-73, रमेश मेंडिस 1-10).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *