महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २८ । मुंबई । मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्या नवनवे डेटा प्लॅन्स आणत आहेत. त्याचबरोबर या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वांना परवडेल असा एक अभिनव उपाय मोबाईल सेवा प्रदाता कंपन्यांनी आणला आहे तो म्हणजे डेटा व्हाउचर्सचा (Data Vouchers). या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी डेटाची सर्वाधिक गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी फक्त डेटा देणारी फोर जी डेटा व्हाउचर्स बाजारात आणली आहेत. यामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल(Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपन्यांनी आघाडी घेतली असून, त्यांनी अत्यंत स्वस्त किमतीत ही व्हाउचर्स उपलब्ध केली आहेत.
रिलायन्स जिओचे फोर जी डेटा व्हाउचर अवघ्या 11 रुपयांत, व्होडाफोन आयडियाचे 16 रुपयात तर एअरटेलचे ४८ रुपयांत व्हाउचर उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओ व्हाउचर : रिलायन्स जिओच्या फोर जी डेटा व्हाउचरची किंमत फक्त 11 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना 1 जीबी डेटा मिळतो. यामध्ये व्हॅलिडिटीची अट नाही म्हणजे कितीही दिवस वापरू शकता, तसंच व्हॉईसकॉलिंगची सुविधा नाही.
एअरटेल व्हाउचर : एअरटेलच्या व्हाउचरची किंमत 48 रुपयांपासून सुरू होते. यात ग्राहकांना 3 जीबी डेटा मिळतो. 28 दिवसांच्या आत कधीही युजर हा डेटा वापरू शकतात. यामध्येही व्हॉईसकॉलिंगची सुविधा नाही.
व्होडाफोन आयडिया व्हाउचर : व्होडाफोन आयडियाच्या सर्वात स्वस्त डेटा व्हाउचरची किंमत 16 रुपये आहे. यामध्ये कंपनी ग्राहकांना एक जीबी डेटा देते. यामध्येही व्हॉईसकॉलिंगची सुविधा नाही.