हवामान बदल ; भारतही प्रभावित ; यादीत 7 व्या स्थानावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – दि. २९- मुंबई – 2000 ते 2019 दरम्यान हवामान बदल आणि हवामानाशी संबंधित 11000 भयावह घटनांमुळे सुमारे 4 लाख 75 हजारांपेक्षा अधिक जणांनी जीव गमावला आहे तर 2.56 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्सने हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांची यादी सोमवारी प्रकाशित केली आहे. या यादीत भारत 7 व्या स्थानावर आहे.

यादीत मोझाम्बिक, झिम्बाम्बे, बहामास, जपान, मलावी आणि अफगाणिस्तान हे भारतापूर्वीच्या स्थानांवर आहे. बॉन येथील जर्मनवॉच नावाच्या पर्यावरण संघटनेने एक यादी प्रसिद्ध केली असून यात 2000-2019 या कालावधीत झालेल्या तीव्र आणि भयानक हवामानाच्या घटनांच्या आधारावर हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या देशांना सामील केले आहे. 2019 मधील घटनांच्या आधारावर भारताला सातवे स्थान प्राप्त झाले आहे. 20 वर्षांचा विचार केल्यास पोर्टो रीको, म्यानमार आणि हैती या देशांना हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

नेदरलँडमध्ये सुरू झालेल्या जागतिक अनुकूलन शिखर परिषदेपूर्वी हा अहवाल सादर करण्यात आला आहे. या संमेलनात संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस हे विकसित देशांनी विकसनशील देशांना मदत करण्याच्या मुद्दय़ावरून चर्चा घडवून आणतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *