महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – दि. २९- जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 10.14 कोटी पार झाली आहे. 7 कोटी 32 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 21 लाक 82 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी www.worldometers.info/coronavirus नुसार आहे. मागील महिन्यातच ब्रिटनमध्ये कोविड-19चा नवीन व्हेरियंट आढळला होता. आता WHO ने याबाबत नवीन चेतावणी जारी केली आहे. कोविड-19चा हा नवीन व्हेरियंट 70 देशांमध्ये पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. दुसरीकडे अमेरिकेत पुन्हा रुग्ण वाढत आहेत.
मागील महिन्यात ब्रिटनमध्ये आढळलेला कोविड-19चा नवीन व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. WHO नुसार, हा व्हेरियंट आतापर्यंत 70 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. हा व्हायरस अधिक धोकादायक आहे, कारण तो जुन्या व्हायरसपेक्षा वेगवान पसरतो. WHO ने संदर्भात आपला साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. संस्थेने या प्रकाराला B.1.1.7 किंवा VOC 202012/01 असे नाव दिले आहे. दिलासादायक बाब म्हणजे ब्रिटेन, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड्समध्ये या नव्या प्रकारची प्रकरणे झपाट्याने कमी झाली आहेत.
ब्रिटनमध्ये आढळलेला व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या व्हेरियंटपेक्षा वेगळा आहे. WHO नुसार, दक्षिण आफ्रिकेत आढळलेला व्हेरियंट ब्रिटनच्या व्हेरियंट इतका वेगाने पसरत नाही. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला व्हेरियंट 31 देशांमध्ये पोहोचला आहे.