कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार ; पडद्यावर दिसणार आणीबाणी आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारची कहाणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३०। मुंबई । आगामी ‘थलायवी’ या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनोट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटानंतर आता कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका ज्या चित्रपटात साकारणार आहे, तो बायोपिक नसणार आहे, अशी माहिती मिळत आहे. कंगनाने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक आघाडीचे कलाकार काम करताना दिसणार आहेत.

अखेरच्या टप्प्यात आहे स्क्रिप्टचे काम
कंगनाच्या ऑफिसमधून एक ऑफिशिअल स्टेटमेंट समोर आले आहे. त्यानुसार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेविषयी कंगना म्हणाली, ‘होय आम्ही या प्रोजेक्टवर काम करत आहोत आणि या चित्रपटाचीस्क्रिप्ट लवकरच पूर्ण होईल. हा चित्रपट इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसेल. मात्र आजकालच्या पिढीला देशातील सद्य सामाजिक-राजकीय परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करणारा भव्य चित्रपट असेल.’

कंगनाने पुढे सांगितले, ‘आणखी बरेच नामांकित कलाकार या चित्रपटात काम करतील आणि इंदिरा गांधी म्हणून मी भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप उत्साही आहे.’ हा चित्रपट एका पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटात ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणी परिस्थितीवरही प्रकाश टाकला जाईल.

साई कबीर करतील दिग्दर्शन
‘रिवॉल्व्हर रानी’ या चित्रपटात कंगना रनोटसोबत काम करणारे दिग्दर्शक साई कबीर या चित्रपटाची कथा आणि स्क्रिनप्लेवर काम करत आहेत. याशिवाय चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरादेखील तेचसांभाळणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून इंदिरा गांधींव्यतिरिक्त राजीव गांधी, संजय गांधी, मोरारजी देसाई, लाल बहादूर शास्त्री या काळातील तत्कालीन राजकीय नेत्यांची व्यक्तिरेखादेखील पडद्यावर आणली जाणार आहे. सध्या भोपाळमध्ये ‘धाकड’च्या शूटिंगमध्ये बिझी असलेल्या कंगनाला साई कबीर जाऊन भेटले आहेत आणि दोघांची या चित्रपटावर बरीच चर्चादेखील झाल्याचे समजते.

कंगनाचे हे चित्रपट आहेत रांगेत
कंगनाने अलीकडेच जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलाईवी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय कंगनाने ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगलाही तिने सुरुवात केली आहे. तसेच अलीकडेच कंगनाने ‘मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिड्डा’ आणि ‘अपराजिता अयोध्या’ नावाच्या चित्रपटांची घोषणा देखील केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *