महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३०। नवी दिल्ली । मागच्यावर्षी सोने मागणी जवळपास 35 टक्क्यांनी कमी झाली आहे. दरम्यान मागणी 446.4 टनावर राहिली असून 2019 मध्ये सोन्याची एकूण मागणी 690.4 टन राहिली होती. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे (भारत) व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम यांनी ‘गोल्ड डिमांड ट्रेंड्स-2020 चा अहवाल सादर करताना वरील माहिती दिली आहे. 2020 मध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी 42 टक्क्यांनी आणि एकूण सोने गुंतवणूक 11 टक्क्यांनी कमी राहिल्याची नोंद केली आहे.
मागील वर्षात देशामध्ये 1.88 लाख कोटी रुपयांचे सोने विक्री झाले असून हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 14 टक्क्यांनी कमी राहिला आहे. वर्ष 2019 मध्ये 2.17 लाख कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाल्याची नोंद आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही
2019 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये सोने मागणी 194.3 टन होती, जी 2020 मधील तीन महिन्यांमध्ये 186.2 टन राहिली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही दरम्यान सोने दागिन्यांची मागणी 315.9 टन आणि सोन्याची एकूण गुंतवणूक 130.4 टनावर राहिल्याची माहिती आहे.