एक जवान शहीद ; जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन;

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.४। नवीदिल्ली । पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला.जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्हाजवळील सीमा रेषेजवळ बुधवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा उल्लंघन केले. सुंदरबनीमध्ये हा गोळीबार केला. संरक्षक प्रवक्त्यांनी सांगितले की, सीमा रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. 2021 मध्ये आतापर्यंत 4 जवान शहीद झाले आहेत.


बुधवारी पाकिस्तानकडून गोळीबारास सुरुवात करण्यात आली. भारतीय सैन्याने ही या गोळीबारास प्रत्युत्तर दिले. यामध्ये एक जवान गंभीररित्या जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान, जवानाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांचे नाव सीपाही लक्ष्मण असे आहे. ते जोधपूरचे रहिवासी होते. सीपाही लक्ष्मण हे शूरवीर, प्रेरणादायी आणि समर्पित जवान होते. देशासाठी त्यांनी पत्करलेले हौतात्म्य आणि त्यांची निष्ठा कायम देश लक्षात ठेवेल, असे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *