महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.६। चेन्नई । भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज ( दि. ६ ) इंग्लंडने आपला पहिला डाव ३ बाद २६३ पासून पुढे सुरु केला. दुसऱ्या दिवशी भारतासमोर इंग्लंडचा कर्णधार जो रुटचे मोठे आव्हान आहे. तो पहिल्या दिवशी १२८ धावा करुन नाबाद होता. तर त्याला साथ देणारा डॉमिनिक सिब्ले पहिल्या दिवस संपायला ३ चेंडू शिल्लक असताना बाद झाला. त्याने ८७ धावांची दमदार खेळी केली. आज सकाळी इंग्लंडने पुढे खेळण्यास सुरुवात केली त्यावेळी रुटच्या साथीला बेन स्टोक्स आला आहे .