महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ ।लाहोर । दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाला सोमवारी लाजिरवाण्या कसोटी पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर 95 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. याआधी 2003 साली म्हणजेच 18 वर्षांआधी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. या कसोटीत दहा बळी गारद करणारा हसन अली सामनावीर ठरला. तसेच मोहम्मद रिझवानची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.