अंडरसनचे धक्के, टीम इंडियासमोर सामना वाचवण्याची परीक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – चेन्नई – दि. ९ – इंग्लंडने ठेवलेल्या 420 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची (India vs England) अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पाचव्या दिवसाचा लंच होईपर्यंत टीम इंडियाचा स्कोअर 144/6 एवढा झाला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 45 रनवर तर आर.अश्विन (R.Ashwin) 2 रनवर नाबाद खेळत आहेत. पाचव्या दिवसाची सुरूवात भारताने 39-1 अशी केली होती. यानंतर अंडरसनने (James Anderson) 3 विकेट घेतल्या, तर डॉम बेसला 2 आणि जॅक लिचला 1 विकेट मिळाली.

शुभमन गिल 50 रनवर, चेतेश्वर पुजारा 15 रनवर, अजिंक्य रहाणे 0 रनवर, ऋषभ पंत 11 रनवर आणि वॉशिंग्टन सुंदर शून्य रनवर आऊट झाले.

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर 578 रनचा डोंगर उभारला. यानंतर भारताला 337 रनच करता आले. 200 पेक्षा जास्त रनची आघाडी मिळवूनही इंग्लंडने भारताला फॉलो-ऑन दिला नाही. तिसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा 178 रनवर ऑल आऊट झाला. ऑफ स्पिनर अश्विनने 6 विकेट घेतल्या, तर नदीमला दोन आणि ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराहला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) दृष्टीने भारत-इंग्लंड यांच्यातली ही चार टेस्ट मॅचची सीरिज महत्त्वाची आहे. न्यूझीलंडची टीमने आधीच फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *