महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० । मुंबई । अकरावीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या शेवटच्या फेरीत आतापर्यंत 3 हजार 68 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे. यापैकी 2 हजार 363 विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेतले असून 3 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज रद्द झाले आहेत. या प्रवेशानंतर अकरावीच्या तब्बल 79 हजार 162 जागा रिक्त आहेत.
प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने प्रवेशाची शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱ्य़ास प्रथम प्राधान्य फेरी- 2’ ला सुरुवात झाली असून ‘ऑनलाइन प्रवेश’ कॉलेजमध्ये जाऊन ‘निश्चित’ करण्यासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी 12 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार नसून मिळालेला प्रवेश शनिवार, 13 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करता येणार आहे.
12 फेब्रुवारीपर्यंत : ‘प्रथम येणाऱ्य़ास प्रथम प्राधान्य फेरी-2 नुसार कॉलेजच्या जागेसाठी अर्ज करता येणार.
13 फेब्रुवारीपर्यंत : कॉलेज अलॉट झाल्यावर ‘प्रोसिड टू ऍडमिशन’ हा पर्याय स्वीकारणे. संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे.
14 फेब्रुवारी : सर्व रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार.