भोसरी इंद्रायणी नगर श्री स्वामी समर्थ स्कूल येथे सडक सुरक्षा सप्ताहा बाबत मार्गदर्शन शिबीर उत्साहात

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१२ । पिंपरी-चिंचवड। रस्त्यावर सायकल चालवित असताना काळजी घ्या . वाहन चालवतांना हेल्मेट वापरावे ,सुरक्षित अंतर ठेवूनच रस्ते नियमांचे काटोकोरपणे पालण करून आपला व समोरच्या व्यक्तिचा जीव वाचवावा. वाहन चालवित असताना मोबाईलचा वापर टाळावा, रस्त्यावर वाहने चालवित असताना योग्य खबरदारी घ्यावी, तसेच सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत व कोवीड १९ बाबत भोसरी वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक रविंद्र चौधरी व सहायक पोलीस निरीक्षक मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

अमरज्योत तरुण मंडळ संस्थेचे श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल, व सेमी इंग्लिश शाळेच्या प्रांगणात सडक सुरक्षा सप्ताह शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी चौधरी इयत्ता 5 वी ते 12 वीच्या करत होते. सदर शिबीर गुरुवार, 11 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सडक सुरक्षेविषयी जागरुकता, हेल्मेटचा सुयोग्य वापर, अपघातसमयी सहायता, वाहनचालकांमध्ये सुरक्षित अंतर तसेच कोव्हीड 19, मास्क वापरासंदर्भात, स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शिबीरास संस्थेचे अध्यक्ष यशवंत बाबर, मुख्याध्यापक बी. के. डोंगरे, व सर्व शिक्षकवृंद, सहायक पोलीस निरीक्षक मिसाळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *