आर्थिक अंदाज पत्रक 2021 नुसार….या पुढे भागीदारी संस्थेच्या जंगम मालमत्तेवर ( Fixed Assets) भांडवली नफ्या नुसार भांडवली कर ( Capital Gain ) भरावा लागणार आहे……पि.के.महाजन…जेष्ठ कर सल्लागार
आर्थिक अंदाज पत्रक 2021 नुसार….या पुढे भागीदारी संस्थेच्या जंगम मालमत्तेवर ( Fixed Assets) भांडवली नफ्या नुसार भांडवली कर ( Capital Gain ) भरावा लागणार आहे……पि.के.महाजन…जेष्ठ कर सल्लागार
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. १२ – नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाज पत्रक 2021 नुसार या पुढे भागीदारी संस्थेच्या जंगम मालमत्तेवर ( Fixed Assets) भांडवली नफ्या नुसार भांडवली कर ( Capital Gain ) भरावा लागणार आहे. आयकर कायद्यात नवीन कलम 45 (4) समाविष्ट करून हि तरतूद करण्यात आली आहे.भागीदारी संस्थेच्या दिवाळखोरी च्या वेळी किंवा भागीदारी चे रुपांतर मालकी हक्कात किवा कंपनीत करतेवेळी किंवा एखादा भागीदार भागीदारीतुन बाहेर पडणार असेल तेव्हा त्याला त्याच्या हिस्साच्या भांडवलाच्या मोबदल्यात मालमत्ता दिली तर …थोडक्यात भागीदारीची मालमत्ता भागीदारांना त्याच्या हिस्सा प्रणामे त्याच्या भांडवलाच्या मोबदल्यात वाटणी केली तरी त्यावर भांडवली नफ्या प्रमाणे भांडवली कर भरावा लागणार आहे………पि.के.महाजन…जेष्ठ कर सल्लागार.