भारत आणि इंग्लंड कसोटी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा ; तिकीट खरेदीसाठी झुंबड उडाली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – चेन्नई – दि. १२ – :india vs england 2nd test भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर उद्या १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.करोनानंतर भारतात एका वर्षानंतर क्रिकेटला सुरूवात झाली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना येण्याची परवानगी दिली नव्हती. आता दुसऱ्या सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षक सामना पाहू शकतील. यासाठी तिकिटांची विक्री ऑनलाइन करण्यात आली होती. पण तिकीट ऑनलाइन विकत घेतल्यानंतर ते घेण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यावे लागले. याच वेळी सोशल डिस्टसिंगचे तीन तेरा वाजले.

ज्या क्रिकेट चाहत्यांनी ऑनलाइन तिकीट बुक केले होते. ते स्टेडियमवर तिकीट घेण्यासाठी आले. यामुळे मैदानाबाहेर चाहत्यांची एकच झुंबड उडाली. गुरुवारी दिवसभर मैदानाबाहेर चाहत्यांची मोठी रांग लागली होती आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले गेले नाही. बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पण त्यानंतर तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

राज्य क्रिकेट संघटनेने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीची तिकीटे ११ फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध असतील असे सांगितले होते. पण अनेकांना वाटले की ही तिकीटे स्टेडियमवर मिळतील. त्यासाठी त्यांनी गर्दी केली.स्टेडियमबाहेर तिकिटासाठी उभ्या असलेल्या एक चाहता बराच वेळ रांगेत उभा राहिल्याने बेशुद्ध होऊन पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *