आता जुन्या ट्रॅक्टरमध्ये CNG किट बसवता येणार, नितीन गडकरींची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ । नवीदिल्ली । केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते काल सीएनजी ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यात आलं. सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील. याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असंसुद्धा नितीन गडकरी म्हणालेत. (Farmers In India Nitin Gadkari Launchs Indias First Cng Tractor Now Farmer Can Fit Cng Kit In Old Tractor)

शेतीत ट्रॅक्टर वापरण्यासाठी तासाला सरासरी 4 लिटर डिझेल लागते. (खर्च हा ट्रॅक्टरच्या हॉर्सपावरवर अवलंबून असतो) आणि त्याचा खर्च 78 रुपये प्रति लिटरनुसार 312 रुपये येतो. त्याचबरोबर सीएनजीवर ट्रॅक्टर चालविण्यासाठी 4 तासांत सुमारे 180 रुपये खर्च अपेक्षित आहे. एका अंदाजानुसार शेतकऱ्यांना वर्षाकाठी 1 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीएनजी ट्रॅक्टरचे मानक निश्चित केलेत. त्यानुसार बाजारपेठेत हे ट्रॅक्टर उपलब्ध असतील.

ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसविण्यात येणार असून, यामुळे शेतीचा खर्च कमी होईल. ट्रॅक्टर लॉन्च करताना नितीन गडकरी म्हणाले की, सीएनजीच्या इतर वाहनांप्रमाणे सुरुवातीलाही ते सुरू करण्यासाठी डिझेलची गरज भासू शकेल. यानंतर ते सीएनजीवरून चालतील. मेक इन इंडिया अंतर्गत सीएनजी किट तयार आहेत. शेतीमध्ये वापरली जाणारी इतर साधने बायो-सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे, असंही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. देशातील जवळपास 60 टक्के कार, ट्रक, बस आणि ट्रॅक्टर डिझेलवर चालतात. वापरल्या गेलेल्या एकूण डिझेलपैकी 13 टक्के ट्रॅक्टर, शेतीविषयक उपकरणे आणि पंपसेट इत्यादींमध्ये वापरली जातात. डिझेल वाहन 7-8 पेट्रोल वाहनांएवढे प्रदूषण पसरवते. म्हणजेच ट्रॅक्टर 7-8 पेट्रोल कार इतके किंवा जास्त प्रदूषण पसरवितो, कारण ट्रॅक्टरमध्ये कारपेक्षा अधिक शक्ती असते.

7 किलो शेतातल्या कचऱ्यापासून 1 किलो बायो-सीएनजी तयार करता येतो. ते तयार करण्यासाठी सुमारे 15 रुपये खर्च येईल. शेतातल्या कचऱ्याची किंमत 1200 ते 1500 टनानुसार 10 रुपयांच्या आसपास असेल. अशा प्रकारे बायो-सीएनजीची किंमत सुमारे 25 रुपये किलोवर येईल. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते सीएनजी मार्केट दरामध्ये उपलब्ध होईल, परंतु बायो-सीएनजीचा उपयोग यशस्वी झाल्यास त्याचा वापर वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *