आत्माराम भिडे मास्तर पोहोचले गावाकडे, थेट शेतातून केला व्हिडीओ शेअर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ । नाशिक । भटकंती कुणाला नाही आवडत… आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे मास्तरांनीही कामातून ब्रेक घेऊन गावाकडची वाट धरली आहे.

अभिनेता मंदार चांदवडकर त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. आपल्या भावाच्या शेतामधून त्याने हा व्हिडीओ केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शेअर करताना मंदार लिहितो, ”मी आलोय माझ्या मूळगावी नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे हे पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे.”

https://www.instagram.com/p/CLZrBzpHVbh/?utm_source=ig_embed

मंदार चांदवडकर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आत्मराम भिडे ही भूमिका साकारत असून ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. मंदारने मुंबईत जन्मलेल्या मंदार इंजिनिअरिंगचा विद्यार्थ्यी आहे. त्यानंतर तो नोकरीसाठी दुबईला गेले. तिथे तीन वर्षे काम केल्यानंतर, अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी तो परत मुंबईला आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *