दहावी, बारावी उर्तीर्णांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; स्पोर्ट्समधील आहेत त्यांना विशेष प्राधान्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२०।मुंबई । SECR Recruitment 2021: सरकारी नोकरी करण्याची ईच्छा अनेकांची असते. त्यात जर आपण स्पोर्ट्समधील असाल आणि केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात नोकरी करण्याची संधी मिळत असेल तर सोन्याहून पिळवळे असेच म्हणावे लागेल. आता १० वी १२ वी पास उमेदवार आणि जे स्पोर्ट्समधील आहेत अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ते ही कोणतेही परिक्षा न देता फक्त मैदानी चाचणीच्या माध्यमातून.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वने (SECR) मध्ये काही पदांसाठी भरती काढली असून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारिख असून स्पोर्ट कोट्यातून २६ पदांसाठी भरतीसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांनी खेळांमध्ये प्राविण्य मिळवले असेल त्यांच्या खेळांतील चाचणी होईल. त्यानंतर जोडलेल्या स्पर्धांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

गैर तांत्रिक पदांसाठी : उमेदवार हा किमान १२ वी पास असावा.

तांत्रिक पदांसाठी : दहावी पाससह आयटीआय बंधनकारक. तसेच १० वी पासही या पदासाठी अर्ज करू शकतात. मात्र त्या उमेदवारांना तीन वर्षांचे ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. कोणत्याही विषयात पदवी संपादन केलेले उमेदवार ही अर्ज करू शकतात

वयाची अट : या पदासाठी उमेदवाराचे कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त २५ वर्ष असावे.

अर्ज शुल्क : सामान्य वर्गातील उमेदवारांना ५०० रुपये, एससी, एसटी उमेदवार आणि महिलांसाठी २५० रुपये. हे हे शुल्क ऑनलाईन भरायचे आहे

अधिकृत लिंक : https://secr.indianrailways.gov.in/uploads/files/1611295118372-Sports%20Eng.pdf

अर्जासाठी लिंक : http://103.229.25.252:8080/RRCBSP_SPORTS2020/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *